2.6 Vithoba-chi Aarti

।। विठोबाची आरती ।।


युगे अठ्ठावीस विटेवरी उभा  । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।।

पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा । चरणी वाहे भीमा उद्धारी जगा  ।। १ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा पावे जिवलगा ।। जय०।। धृ.।।


तुलसी माला गळा कर ठेवूनी कटी । कां सें पितांबर कस्तुरी लल्लाटी ।।

देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे राहती ।।२।। जय०।।


धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाला । सुवर्णाची कमले वनमाला गला ।।

राणी रखुमाबाई राणीया सकला । ओवाळिती राजा विठोबा सावळा ।।३।। जय०।।


ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती । चंद्रभागेमध्ये सोडुनिया देती  ।।

दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।। जय०।।


आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती ।।

दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती । केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।।

No comments:

Post a Comment