2.8 Hartalike chi Aarti



।। हरितालिके ची आरती ।।


जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओवाळीते । ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥


हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥
तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. १ ॥


रिघसी हिमाद्रिच्या पोटी । कन्या होसी तूं गोमटी ॥
उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ॥ जय.॥ २ ॥


तपपंचाग्निसाधने । धुम्रपाने अघोवदने केली बहु उपोषणे ॥
शुंभ भ्रताराकारणें ॥जय. ॥ ३ ॥


लीला दाखविसी दृष्टी । हे व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावे संकटी ॥ जय. ॥ ४ ॥


काय वर्णू तव गुण । अल्पमती नारायण ॥

माते दाखवी चरण । चुकवावे जन्म मरण ॥ जय देवी ॥ ५ ॥



※    ※    ※       

No comments:

Post a Comment