2.9 Ekvira devi chi Aarti



।। एकविरादेविची आरती ।।


येई हो एकवीरा देवी माझे माऊली ये । माझे माऊली ये ॥

दोन्ही कर जोडुनि तुमची वाट मी पाहे ॥ धृ. ॥


आलीया गेलीया अंबे धाडी निरोप ।

कारल्यामध्ये आहे माझी एकवीरा माय ॥ १ ॥


पिवळी साडी ही अंबे कैसी गगनी झळकली ॥

व्याघ्रावरी बैसोनी माझी एकवीरा देवी आली ॥ २ ॥


एकवीरेचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ॥

एकवीरा देवी नाम तुमचे भावे ओवाळी ।

येई हो एकवीरा देवी. ॥ ३ ॥




※    ※    ※   

No comments:

Post a Comment