2.3 Devi-chi Aarti





।। देवीची आरती  ।।

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी । अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी ।  

वारी वारी जन्म मरणांते   तेवारी । हारी पडलो आता संकट नीवारी ।।

जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी । सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ।। जयo ।।धृ ।।

 

त्रिभुवनी पाहत तुज ऐसे नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।

साही विवाद करिता पडिलो प्रवाही । ते तू भक्तालागी  पावस लवलाही ।।१।। जयo ।।
 
  
प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा । क्लेशांपासून सोडी तोडी  भवपाशा ।

आंबे तुजवाचून कोण पुरवी आशा । नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा ।।२।। जयo ।।


※   ※    ※   ※  
 
 

No comments:

Post a Comment