।। दत्त गुरूंची आरती ।।
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।।
नेति नेति शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।।१।।
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त । अभाग्यासी कैसी न कळे ही मात ।।
पराही परतली तेथे कैचा हा हेत । जन्म मरणाचा पुरलासे अंत ।।२।।
दत्त येऊनिया उभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ।।
प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ।।३।।
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ।।
मी तू पणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ।।४।।

No comments:
Post a Comment