2.4 Sankara-chi Aarti

।। शंकराची आरती ।।

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा l विषे कंठी  काळा त्रीनेत्री ज्वाळा ।।
लावण्य सुंदर मस्तकीं बाळा l तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळा ।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा l आरती ओवाळु तुज कर्पुरगौरा ।। धॄ.।।
 
कर्पुरगौरा भोळा नयनीं  विशाळा l अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ।।
विभुतीचें उधळण शिवकंठ नीळा l ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ।।१।। जय देव जय देव
 
दैवीं दैत्यीं सागर-मंथन पै केलें l त्यामाजी अवचीत हालाहल उठीलें ।।
तें त्यां असुरपणें प्राशन केलें  l नीळकंठ नाम प्रसिध्द झाले ।।२।। जय देव जय देव
 
व्याघ्रांबर - फणिवरधर सुंदर मदनारी l पंचानन मनमोहन मुनीजन सुखकारी ।।
शतकोटीचें  बीज वाचें  उच्चारी l रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ।।३।। जय देव जय देव
 
 
 
 
 

 
 
 

No comments:

Post a Comment