।। मानू देवी ची आरती ।।
जयदेवी जयदेवी जय श्री मनुमाते । आरती ओवाळीतो सद् भावे तुते।। धृo ।।
सातपुडा निवासिनी कुलस्वामिनी मनुआई । वरिसी विघ्ने सत्वरी भक्ताची तू पाही ।। जयo ।। १।।
भक्तीभावे तुजला जे कोणी भजती । प्रसन्न होऊनी देसी संतती, सुख, संपत्ती ।।जयo ।। २।।
आदी अनादी अनामय तु अविनाशी । श्री देव श्री गणो तव सानिध्यासी ।।जयo ।। ३।।
मनुदेवी, मनुआई, मनुबाई तुज वंदती । तारी तु आता भक्त शरण तुजी ।।जयo ।। ४।।
चैत्र शुद्ध अष्टमी अतीप्रिय तुजी । करुणा कर तु सांभाळी बाळासि ।।जयo ।।५।।
पाहुनी निसर्ग रम्य तुझा अतिदिव्य परिसर । मन रमते तुजपाशी शरण तवं किंकरा ।।जयo ।।६।।
भक्त पावना शांत स्वरुपा श्री मनुआई । ठाव दे भक्तासी सत्वरी तव पायी ।।जयo ।। ७।।
धुप, दीप, नैवेद्द आरती सद् भावे तुज करितो । अनन्य होऊनी भावे तुज मी निमतो ।।जयo ।। ७।।
सातपुडा निवासिनी इह्पर सिध्दीप्रदे । चंद्रभागा सुत चरण शरण माते वर दे ।।जयo ।। ९।।
※ ※ ※ ※
No comments:
Post a Comment